सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याची बुधवारी रोजी आगमन झाले. या पुतळ्याचे सिल्लोड शहरात शिवप्रेमी नागरिकांनी भव्य स्वागत केले.
सिल्लोड तालुक्यातील मोडा खुर्द येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याने आज सिल्लोड शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते या अति भव्य पुतळ्याचे शहरातून वाजत
गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी पक्षाच्या प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत केले.










